Saturday, July 27, 2024

पेशाचे गुणधर्म

अर्थव्यवस्थेत कोणत्याही वस्तूला पैसा म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्या वस्तूमध्ये पुढील गुणधर्म
असणे आवश्यक आहे.
१)सार्वत्रिक स्वीकार्यता : जी वस्तू (सिक्के, नाणी, कागदी नोटा, धातू, चांदी, तांबे इ.) पैसा म्हणून कार्य करते,
ती सर्वांनी विनिमय कार्यासाठी वापरली पाहिजे. सार्वत्रिक व्यवहार करण्यासाठी तिचा स्वीकार सरकार व समाजाद्वारे
करावयास हवा.
२)टिकाऊपणा : जी वस्तू सार्वत्रिक स्विकार्यतेद्वारे विनिमयासाठी वापरली जाते, ती वस्तू
दीर्घकाळासाठी टिकाऊ असली पाहिजे.
३)विभाज्यता : पैसा म्हणून स्वीकारल्या जाणाऱ्या वस्तूचे १ रु., ५ रु., १० रु.२०रु. ५० रु. १०० रु.
२०० रु.५०० रु.२००० रु. अशा मूल्यात विभाजन करता आले पाहीजे.
४)एक जिनसीपणा : पैसा म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तूत आकार, रंग, डिझाईन, मूल्य, दर्जा इ. मध्ये
एकजिनसीपणा असला पाहिजे.
५)सुज्ञेयता : ज्या वस्तूस पैसा म्हणून स्वीकार्यता प्राप्त झाली आहे, ती चटकन ओळखता आली पाहिजे व इतर
वस्तूंपासून त्या वस्तूंचे वेगळेपण दिसले पाहिजे.
६)मूल्यस्थिरता : पैसा म्हणून स्वीकारण्यात आलेल्या वस्तूंचे मूल्य साधारणपणे स्थिर असले पाहिजे.
७)वहनीवता : जी वस्तू पैसा म्हणून स्वीकारण्यात आली, ती एकीकडून दुसरीकडे विनाकष्ट, विनाखर्च, गैरसोयीशिवाय
वाहून नेता आली पाहिजे. त्यांच्यामध्ये कमी आकारात अधिक मूल्य सामावण्याची शक्ती असली पाहिजे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles