Thursday, June 20, 2024

महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2019 मुलाखतीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा -2019 च्या मुलाखती 4 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2020 अखेर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती किशोर राजे निंबाळकर, सचिव, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

दिनांक 4 ऑगस्ट, 2020 रोजी मुंबई आयोगाचे कार्यालय येथे, दिनांक 6 व 7 ऑगस्ट रोजी नागपूर येथे, दिनांक 10 ते 14 ऑगस्ट रोजी पुणे येथे, दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे तर दिनांक 20 व 21 ऑगस्ट, 2020 रोजी नाशिक याठिकाणी परीक्षा होणार आहेत.

सध्या महाराष्ट्रात कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव असल्याने आंतर जिल्हा प्रवासाचे नियमन केले जात आहे. त्यामुळे मुलाखतीचा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याच्या अनुषंगाने मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. उमेदवारांचे मुलाखत पत्र हे त्यांच्यासाठी आंतर जिल्हा प्रवासाचा पास म्हणून ग्राहय धरण्यात यावा. यासाठी स्वतंत्र ई पास/इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता असणार नाही. (संबंधीत उमेदवार यांनी प्रवासाच्या दरम्यान त्यांचे मुलाखतीचे पत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे)

कोव्हिड-19 विषाणुचा प्रसार होवु नये म्हणून केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचना/ निर्देशाचे पालन करण्यात यावे. नागपूर, पुणे, औरंगाबाद व नाशिक येथे आयोजित मुलाखती संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील ज्या अधिकारी/कर्मचा-यांची नियुक्ती केली जाईल. त्यांचेसाठी मुंबई मुख्यालयातून मुलाखतीच्या ठिकाणापर्यंत व परतीच्या प्रवासासाठी त्यांच्या या संदर्भातील नेमणुकीचे आदेश आंतरजिल्हा प्रवासासाठी पास म्हणून ग्राहय धरण्यात येईल. (संबंधीत अधिकारी/कर्मचारी यांनी प्रवासाच्या दरम्यान त्यांचे ओळखपत्र व नियुक्तीचे आदेशाची प्रत सोबत बाळगणे आवश्यक आहे) कोणताही उमेदवार मुलाखतीपासून वंचित राहणार नाही व कोणत्याही ठिकाणी त्यांची अडवणुक होणार नाही याबाबतच्या सुचना संबंधितांना निर्गमित करण्यात याव्यात. असेही श्री. निंबाळकर, सचिव, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन यांनी कळविले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles