Saturday, July 27, 2024

मुंबईत सरकारी नोकरीची उत्तम संधी.. या खात्यात मोठी भरती सुरु

अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालय अंतर्गत भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. तुम्हीही नोकरीसाठी इच्छुक असाल तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो, अर्ज प्रक्रिया 22 एप्रिल 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.

भरले जाणारे पदे :
ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर पदांसाठी भरती होणार आहे.

आवश्यक पात्रता : या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमाची डिग्री असणेआवश्यक आहे.

वयाची मर्यादा : या पदांकरिता 18 ते 27 वर्षांपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे विशेष सूट देण्यात आली आहे.

याकरिता उमेदवारांना अर्ज शुल्क देखील भरावे लागणार आहे, जनरल/ओबीसी 200/ रूपते तर SC/ST/PWD/ExSM/महिला यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

पगार ल या भरती अंतर्गत उमेदवाराची निवड झाल्यास, त्याला दरमहा 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये इतका पगार मिळेल.

अर्जदारांना कळवण्यात येते की, ही भरती मुंबई येथे होत आहे. तरी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या अधिकृत वेबसाईट https://www.dpsdae.gov.in/ ला भेट द्या आणि अर्ज करा.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 22 एप्रिल 2023]

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles